रत्नागिरी

संगमेश्वरात पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने ‘ शिवजयंती ’ उत्साहात!

पैसा फंड इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचा अपूर्व उत्साह; ढोल ताशांचा आणि लेझीम गजर

संगमेश्वर दि. १९ ( प्रतिनिधी ):- अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह प्रशालेतील सर्व कर्मचाऱ्यांनी आज संगमेश्वर बाजारपेठेतून ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्याच्या साथीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढली .

महाराजांचे शौर्य, सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या आदर्शांजवळ युवकांना जोडणे या प्रमुख उद्देशाने शिवजयंती निमित्त आज व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी वर्गाने प्रशाला ते संगमेश्वर बाजारपेठ मार्गे ही भव्य मिरवणूक काढली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत हर हर महादेव अशा घोषणा देत ही मिरवणूक ज्यावेळी संगमेश्वर बाजारपेठेत आली.

त्यावेळी सर्व व्यापारी आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशात तसेच स्वराज्याचे मावळे बनून विद्यार्थी सहभागी झाले होते. या पारंपारिक आणि भव्य मिरवणुकीचे संगमेश्वर येथील व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, पालक आदींनी प्रशालेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button