रत्नागिरी
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केली रत्नागिरी विमानतळ व रेल्वे स्थानकाच्या कामाची पाहणी

रत्नागिरी दि. ११ :- रत्नागिरी विमानतळाचे सुरू असणारे बांधकाम तसेच रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी नुकतीच केली. यावेळी आमदार किरण सामंत हेही उपस्थित होते.
रत्नागिरी विमानतळाचे काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी विमानतळाला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला.
त्याचबरोबर रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. या स्थानकातील प्लॅटफॉर्मचे नूतनीकरण करण्यात येत असून, याही कामाची पाहणी करून जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार किरण सामंत उपस्थित होते.


