रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये “जी आय मानांकन व आंबा निर्यात”बाबत कार्यशाळा

रत्नागिरी दि. १० :- रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आय मानांकन व आंबा निर्यातबाबत बाजार समितीचे सभागृहात दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.०० या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा विनामुल्य आहे. कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कृषि अधिक्षक रत्नागिरी, उपसरव्यवस्थापक कृषि पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालय रत्नागिरी आणि आंबा निर्यातदार श्री. शिवराज तावरे बारामती हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व आंबा उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. संदीप सुर्वे यांनी केले आहे.



