रत्नागिरी

राजेंद्र माने महाविद्यालयाचा “साय एक्सपो २०२६ “ उपक्रम उत्साहात संपन्न

देवरूख दि. २७ :-  जिल्ह्यातील नजीकच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धांची ओळख व्हावी, त्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी व त्यातून त्यांना या अभ्यासक्रमाची ओढ लागावी या दृष्टीकोनातून आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दरवर्षी साय एक्स्पो तसेच आय स्पार्क सारखे उपक्रम राबवले जातात. त्यामधील “साय एक्स्पो २०२६” हा स्पर्धा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागाने विद्यार्थ्यांच्या असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (एस) संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल देवरुख , पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल देवरुख, माध्यमिक आश्रम शाळा, निवे बुद्रुक, मिनाताई ठाकरे हायस्कूल,कोसुंब हायस्कूल,दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी मधील जवळपास शंभर शालेय विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभाग झाले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे, प्रा. प्रियांका वनकर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून राज जाधव, अगस्ती कुमटेकर तसेच पालक प्रतिनिधी म्हणून चंदन चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

त्यानंतर या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, चित्रकला, प्रश्नमंजुषा, नकाशा भरणे यासारख्या आकर्षक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये नकाशा भरणे स्पर्धेत प्रथम क्रमांक यशश्री प्रल्हाद गमरे (पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल), द्वितीय क्रमांक कार्तिकी प्रितेश विंचू (पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल) आणि तृतीय क्रमांक प्रेम विकास राठोड (माध्यमिक आश्रम शाळा, निवे बुद्रुक) यांनी पटकाविला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. ललित दत्ताराम पातेरे (मिनाताई ठाकरे हायस्कूल), द्वितीय क्रमांक मृणाल प्रफुल कांबळे (निवे हायस्कूल) आणि तृतीय क्रमांक मंथन संतोष लिंबुळकर (कोसुंब हायस्कूल), हर्ष विजय डिके उत्तेजनार्थ पारितोषिक यांनी मिळविला.

विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक रुद्र चव्हाण आणि मीर मुळ्ये (बुरांबी हायस्कूल), द्वितीय क्रमांक सायली माने आणि दिया लाड (निवे हायस्कूल) तर तृतीय क्रमांक यशश्री गमरे आणि कार्तिकी विंचू (पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल) यांनी पटकाविला.

तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मृणाल एस. मोहिरे आणि आर्या एम. लोहिया ( पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल), द्वितीय क्रमांक गणेश लोटणकर आणि आरुष चव्हाण (पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल) तर तृतीय क्रमांक संस्कार करांडे आणि सर्वेश रेडिज (पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल) यांनी पटकाविला.

या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. यानंतर सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके व पारितोषिके वितरीत करण्यात आली.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. प्रियांका वनकर, विद्यार्थी समिती प्रमुख सिद्धेश गुरव तसेच विभागीय प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी सदस्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button