रत्नागिरी

प्रजासत्ताक दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील ६ बेटांवर करण्यात आले ध्वजारोहण

रत्नागिरी दि. २७ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DGP-IGP परिषद 2024 मध्ये सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील निर्जन (Uninhabited) बेटांवर दरवर्षी दिनांक १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करावे तसेच त्या ठिकाणी रात्र वास्तव्य करावे, असे निर्देश महाराष्ट्र पोलीस दलाला दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने, प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी हद्दीत असलेल्या बेटांवर रत्नागिरी पोलीस दलामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५ बेटे असून त्यापैकी २ बेटे मनुष्यवस्तीची व १३ बेटे निर्मनुष्य आहेत. या पैकी खालील नमूद ६ बेटांवर दिनांक २६ जानेवारी रोजी यशस्वीरित्या ध्वजारोहण करण्यात आले.

सुवर्ण दुर्ग किल्ला (बेट), हर्णे, दापोली, बाबा मलंग दर्गा, खेड,  जुवाड पेठ बेट, गोवळकोट, चिपळूण, जुव्याचे पेंद, कुरधुंडा, संगमेश्वर, जुवे बेट, बुरंबेवाड, नाटे, वाकडवन, कोंडसर, नाटे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.

या पैकी दापोली पोलीस ठाणे हद्दीमधील सुवर्ण दुर्ग किल्ला (बेट), हणें, दापोली येथे मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक श्री. महेश तोरस्कर, दापोली पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक जि.वि.शा. श्री. अश्वनाथ खेडकर पो.उनि. श्री. हेमराज निर्मळ, पो.उनि. श्री. राजकुमार यादव, दापोली पोलीस ठाणे, मत्स्य विभाग व बंदर विभाग दापोली येथील कर्मचारी वर्ग, पोलीस पाटील, माजी सैनिक, एन.सी.सी चे विद्यार्थी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

सदर उपक्रमातून सागरी सीमांची सुरक्षितता, राष्ट्रीय सार्वभौमत्व व अखंडता जपणे तसेच निर्जन बेटांवर पोलीस सुरक्षा यंत्रणांची प्रभावी उपस्थिति बाबत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button