
रत्नागिरी दि. २५ :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यावतीने नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूलने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात यश मिळवले. २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलच्या संघाने अटीतटीच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत राज्य चषकावर आपले नाव कोरले.
राज्य स्पर्धेतील प्रवासात मिस्त्री हायस्कूलच्या संघाने प्रारंभी उपांत्य पूर्व सामन्यात बलाढ्य मुंबई विभागाचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या उपांत्य सामन्यात संभाजीनगर विभागावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात नागपूर विभागाविरुद्ध उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मिस्त्री हायस्कूलने विजय मिळवला आणि राज्यस्तरीय चषकाचे मानकरी ठरले. या यशस्वी संघात आयान अन्सार सोलकर, शेरान शौकत वस्ता, गुफ्रान शेख, नुमान सैफान चरके, रफान सोलकर, जवाद वस्ता, जियान मुकादम, जियान होडेकर, जैन सोलकर, कैफ काझी, कासिम बोरकर, कासिम सोलकर, इमान माखाजनकर, असद भाटकर, अर्फिन पावसकर आणि रय्यान सोलकर या खेळाडूंचा समावेश होता. या मुलांच्या दमदार कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विजेची संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा आणि क्रीडा शिक्षक सैफान चरखे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच तालीमी इमदादिया कमिटी व शाळा समितीचे पदाधिकारी निसार लाला, तन्वीर मिस्त्री, शकील मजगावकर, जाहीर मिस्त्री, रफिक मुकादम, इकबाल मिस्त्री आणि मुंबईहून उपस्थित राहिलेले पाहुणे ईखलास फरीद, श्रीमती शाईस्ता फरीद, फुजेल मिस्त्री यांच्यासह नार्वेल, जेठाम व मिस्त्री परिवारातील सदस्यांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



