रत्नागिरी

रत्नदुर्ग किल्ल्यावर श्री भगवती देवी मंदिरात हळदीकुंकु समारंभाचे आयोजन

रत्नागिरी दि. १४ :- रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेल्या श्री भगवती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदीकुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्री देवी भगवती मंदिर, किल्ला रत्नदुर्ग येथे होणार आहे.

या धार्मिक व सांस्कृतिक समारंभात परिसरातील तसेच रत्नागिरी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भगवती देवी पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष यांनी केले आहे. मकर संक्रांतीनिमित्त आयोजित होणारा हा हळदीकुंकु समारंभ महिलांसाठी भक्तीभाव व आनंदाचे केंद्र ठरणार असून परंपरेचे जतन करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सर्व महिलांनी या हळदीकुंकु समारंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button