रत्नागिरी

देवरुख महाविद्यालयात “मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्य” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

देवरुख दि. ३० ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथील विद्यार्थ्यांसाठी “मूलभूत विज्ञानातील प्रयोगशाळा कौशल्ये” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला एकूण ७५ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून, उच्च शिक्षणातील विविध करिअरच्या संधींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये, उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सविस्तर सादरीकरण केले.

डॉ. सागर संकपाळ यांनी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या मूलभूत विज्ञान शाखांमधील विविध करिअरच्या संधींचे विश्लेषणात्मक पद्धतीने माहिती दिली. प्रयोगशाळा प्रात्यक्षिक सत्रात डॉ. अमित वराळे, डॉ. रणजीत बनसोडे, डॉ. हेमंत चव्हाण व प्रा. प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहितीसह प्रात्यक्षिके दाखविली. विद्यार्थ्यांना काही मूलभूत प्रयोगांचे हँड्स-ऑन ट्रेनिंग देखील देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि प्रयोगशाळा कौशल्ये अधिक मजबूत झाली.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनात काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक कोकणी सर, तसेच प्रा. शिरसाट, प्रा. नटे आणि प्रा. शेळके यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी कार्यशाळेच्या शिस्तबद्ध आयोजन आणि समन्वय यासाठी खास परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरली. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयातील उत्सुकता, प्रयोगशाळेतील कौशल्ये आणि उच्च शिक्षणाबद्दलची जाणीव वाढण्यास मदत झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button