रत्नागिरी

लोटे एमआयडीसी येथील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी संबंधी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा बैठक

रत्नागिरी दि. २४ :- खेड- लोटे एम.आय.डी.सी. मध्ये स्थित असलेल्या “लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड” या कंपनीबाबत सध्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत असलेल्या काही पोस्ट्स आणि व्हिडिओ यांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी पोलीस दलाने या प्रकरणी दखल घेतली असून, कंपनीबद्दल प्राथमिक माहिती घेण्यात आलेली आहे.

तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दि. २३ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कंपनीच्यावतीने प्लांट हेड श्री. दिपक पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत सध्या सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या चिंता, कायदेशीर कामकाजाची आवश्यकता, वैधानिक परवानग्यांचे पालन आणि जनतेशी पारदर्शक संवादाचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींना सर्व लागू कायदे, पर्यावरणीय नियम आणि सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मीडियावरील अस्पष्ट माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या प्रसारित करु नयेत व शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button