रत्नागिरी

आरोग्य सेवा भारतीय मजदुर संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी श्याम कुवळेकर

देवरूख दि. २२ (सुरेश सप्रे) :- महाराष्ट्र आरोग्य सेवा कर्मचारी व मजदूर महासंघाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीत श्यामसुंदर रावजी कुवळेकर यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

राज्यातील हंगामी फवारणी (हिवताप) कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम समावेशन, पेन्शन, सहावा वेतन आयोग फ़रक व पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीमध्ये प्राधान्य अशा विविध मागण्या संदर्भात प्रशासन व सरकार याच्याशी यशस्वी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी अस्थायी कार्य समितीचे सचिव हंसराज दशरथ शिन्दे मो.नं. 9226920456 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button