भारत शिक्षण मंडळ संचलित प.पू.सौ.गोदावरीदेवी भ.बियाणी बालमंदिर विभागात गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग सर स्मृतीदिन

रत्नागिरी दि. २० :- गुरुवर्य जोग सरांच्या स्मृतदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आवडीचे गीत,अभिनयगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री मुसळे यांनी प्रास्ताविक केले.१७० विद्यार्थ्यांनीं उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. प्रमुख अतिथी कृ.चिं आगाशे विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ.शितल ताई काळे यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांच्याहस्ते बक्षिस वितरण करण्यतआले त्यांनी.
आपल्या मनोगतातूनअशा उपक्रमातून बालकांचा भाषिक विकास व साहित्याची ओळख होतेच पण याशिवाय अनेक गोष्टी कशाप्रकारे साध्य होतात ते पालकांना सांगितले .जोग सरांच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शालेय समिती पदाधिकारी राजेंद्र कदम, सनातन रेडीज,पालक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.संपदा भाटवडेकर यांनी केले..


