भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने रत्नागिरी तालुक्यात विविध कामांसाठी ४ कोटीचा विकास निधी उपलब्ध

रत्नागिरी दि. १८ :- भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने रत्नागिरी तालुक्यात विविध कामांसाठी ४ कोटीचा विकास निधी उपलब्ध झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेकडे मागणी केली होती. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विकास निधी आवश्यक आहे असे सांगितले होते, याची तत्काळ दखल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी घेतली व मंत्री महोदय ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य ना. जयकुमार गोरे यांच्याशी पत्र व्यवहार करून रत्नागिरी तालुक्यातील विविध 42 कामना 25/15 हेड खाली निधी उपलब्ध करून दिला.
प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी या कामी मोलाची कामगिरी केली. ४ कोटीचा ग्रामीण भागात विकास निधी उपलब्ध झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे आणि अनिकेत पटवर्धन यांचे आभार मानले.



