रत्नागिरी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे सुशासन दिन साजरा

रत्नागिरी दि. २५ :- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टी शहरातर्फे सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

अटलजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला व सुशासनाच्या संकल्पनेला अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, राजू भाटलेकर, संदीप सुर्वे, ऋषिकेश केळकर, मनोज पाटणकर, नितीन गांगण, प्रसाद बाष्ट्ये, मंदार खंडकर, संतोष सावंत, मंदार भोळे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नितीन जाधव, विजय माळवदे, रामदास शेलटकर, प्रशांत घाणेकर,विक्रम जैन,सुनील किर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात अटलजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या सुशासन, राष्ट्रहित व लोककल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.  उपस्थितांनी अटलजींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत सुशासन दिन साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button