रत्नागिरी

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात कै. द. ज. कुलकर्णी कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेचे ९ डिसेंबर रोजी आयोजन

देवरुख दि. ५ ( प्रतिनिधी ) :- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य कै. द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ २४वी कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा: २०२५-२६ चे आयोजन मंगळवार दि. ९ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाच्या कै. द. ज. कुलकर्णी सभागृहात करण्यात आले आहे. सदर स्पर्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित आहे. या कथाकथन स्पर्धेसाठी ऐतिहासिक, विज्ञान व विनोदी कथा स्पर्धकांना सादर करता येणार आहेत. कथाकथन मराठीतच करावयाचे असून, प्रत्येक स्पर्धकाला कथाकथनासाठी किमान ७ मिनिटे व कमाल १० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेचे निकष कथा आशय, सादरीकरण, सहजता, ओघवतेपणा व एकूण प्रभाव असे असणार आहेत.

कथाकथन स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील कितीही विद्यार्थ्यांना या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठीचा प्रवास खर्च संबंधित महाविद्यालयाने करावयाचा आहे, पूर्वकल्पना दिल्यास निवासाची सोय स:शुल्क करण्यात येईल. स्पर्धेच्या वेळी स्पर्धकांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे स्पर्धेत सहभागी होत असल्याचे पत्र घेऊन येणे गरजेचे आहे. स्पर्धेची पारितोषिके प्रथम क्रमांकासाठी ₹ ४०००/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ₹ २,५००/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ₹ १५००/-, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांकांना ₹ १०००/- आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

कथाकथन स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासांनी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल व लगेच बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. अधिक माहितीसाठी प्रा. संदीप सुरेश मुळ्ये- ९४२१२२८८१९ आणि प्रा. देवयानी सुनील जोशी- ८४५९८३१३८७ आणि कार्यालय फोन:(०२३५४)२६००५८ यांच्याशी संपर्क साधावा. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत आणि प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शन व नियोजननुसार कथाकथन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजन समिती मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button