दत्त जयंती उत्सवामुळे गवळीवाडा परिसरात आज आणि उद्या वाहतूक मार्गात बदल
वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध

रत्नागिरी, दि. ५ – रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील गवळीवाडा परिसरात दत जयंतीच्या आनुषंगाने ५ डिसेंबर रोजी दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्याने या दोन दिवशी गवळीवाडा भागातील अंतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ अन्वये ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.*
कधी आणि कुठे असेल वाहतूक बंद
उत्सवाच्या काळात साई चौक ते धनजी नाका तसेच शिंदे किराणा दुकान ते धनजी नाका या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्गाचा वापर
वाहतूक बंद असलेल्या मार्गावरील नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
पर्यायी मार्ग: साई चौक – शिंदे किराणा दुकान – आंबेडकर वाडी मार्गे धनजी नाका.
अपवाद आणि नागरिकांसाठी सूचना
सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड (अग्निशमन दल), रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) आणि शासकीय व मंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू होणार नाही. निकडीच्या व अत्यावश्यक प्रसंगी त्याठिकाणी तैनात असलेले संबंधित पोलीस अधिकारी हे निर्णय घेवू शकतील.
अधिसूचना ही दि. ०५/१२/२०२५ रोजी १३-०० ते २२-०० व दि. ०६/१२/२०२५ रोजी वेळी १०-०० ते १७-०० वा. पर्यंत या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरुपात निर्गमित करण्यात येत आहे. परंतु, नमुद अधिसूचनेविषयी वाहन चालकांना
या अधिसूचनेबद्दल वाहन मालकांना किंवा चालकांना व अन्य नागरिकांना काही आक्षेप (हरकत) असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदवावेत. नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार करून पुढील आदेश निर्गमित केला जाईल.



