रत्नागिरी

कथाकथन व निबंध स्पर्धेत नवजीवन विद्यालय फुणगुसचे उल्लेखनीय यश! 

संगमेश्वर दि. २७ :- संगमेश्वर तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विद्या समिती आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत नवजीवन विद्यालय फुणगूसची विद्यार्थीनी किर्ती सुजित शिगवण हिने माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक, कु. वेदिका विश्वास बाचिम हिने प्राथमिक गटात निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक, अथर्व दशरथ घेवडे याने माध्यमिक गटात निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

सदर स्पर्धा ही सांग‌मेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्या मंदिर ताम्हाने येथे मंगळवारी संपन्न झाली.

चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धेमध्ये देखील प्रशालेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष चंदुभाई देशपांडे संस्था उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर, सचिव, दिलीप कुळकर्णी तसेच वि‌द्याल‌याचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, पाटील, केंद्रप्रमुख मोवळे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button