रत्नागिरी

आमदार निरंजन डावखरे यांनी घेतली ‘श्रीकृष्ण’ आयुर्वेदिक औषधालयाचे अशोक अभ्यंकर यांची भेट!

रत्नागिरी दि. २६ :- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘विशेष व्यक्ती संपर्क अभियान’ अंतर्गत आज आमदार निरंजन डावखरे यांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘श्रीकृष्ण’ आयुर्वेदिक औषधालयाचे अशोक गोविंद अभ्यंकर यांची भेट घेतली.

१९२५ रोजी स्थापन झालेली श्रीकृष्ण आयुर्वेदिक औषधालय हि रत्नागिरी मधील १०० वर्षे जुनी आयुर्वेदावर आधारित औषधी तयारी करणारी संस्था आहे. आज अभ्यंकर कुटुंबातील श्री. अशोक अभ्यंकर हे चौथ्या पिढीचे प्रतिनिधत्व करताना या व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आहेत.

श्री. अभ्यंकर यांनी श्रीकृष्ण आयुर्वेदिक औषधालयातील सर्व कर्मचार्‍यांशी सविस्तर भेटीगाठी करून दिल्या. यावेळी रत्नागिरीचे माजी शहर अध्यक्ष श्री. सचिन करमरकर आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंदार खंडकर सोबत उपस्थित होते.

कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत महायुतीच्या विकासदृष्टीकोनाची माहिती देत आगामी निवडणुकीत स्थिर विकास, सुव्यवस्था आणि कार्यक्षम प्रशासनाचा संकल्प मांडण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button