रत्नागिरी

वंचित बहुजन आघाडीकडून खालगाव गटातून वैभव प्रभाकर यादव यांचा उमेदवारी अर्ज

विल्ये दि. २४ :- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकिसाठीचे अर्ज दाखल करण्याचा २१ /१/२६ या दिवशी शेवटचा दिवस होता,आणि या दिवशी सर्वात जास्त अर्ज दाखल झाले. वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सामाजिक क्षेत्रात अग्रेसर नाव वैभव प्रभाकर यादव यांनीही वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार खालगाव गट जिल्हा परिषद रत्नागिरी उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्याप्रसंगी पक्षाचे महासचिव धडाडीचे कार्यकर्ते बिपिन अजित आयरे तसेच पक्षाचे तालुका कार्यकर्ते मार्गदर्शक उपस्थित होते.त्याचवेळी देवदत्त प्रकाश कांबळे, बिपीन, रवींद्र कोकरे, चंद्रकांत कांबळे, विजय जाधव, प्रमोद यादव, अजित जाधव, राजेंद्र जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभव प्रभाकर यादव यांच्या उमेदवारी अर्जानंतर विविध गावातून त्यांना पाठबळ आणि मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन शुभेच्छा देत आहे. वैभव यादव हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने विविध समस्यांवर मात करण्यासाठी प्रभावी उमेदवार वंचित बहुजन आघाडीकडून दिल्याचे समाधान जनसमुदायातून व्यक्त होताना दिसत आहे,अशी माहिती वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुका सचिव देवदत्त प्रकाश कांबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button