रत्नागिरी

अश्रूंच्या वादळातून सत्याचा दीप प्रज्वलित! प्रभाग ५ च्या ‘पूजा-दीपक’ यांच्या संघर्षाची कहाणी

मागील चार वर्षांपासून प्रभाग क्रमांक ५ च्या मातीत रुजलेले, इथल्या प्रत्येक नागरिकाच्या सुखा-दुःखात तळमळीने धावणारे एक निष्ठावान दांपत्य म्हणजे दीपक पवार आणि पूजा पवार. त्यांच्यासाठी प्रभाग म्हणजे केवळ ‘मतदार संघ’ नव्हता, तर ते त्यांचे घर आणि कुटुंब होते. त्यांच्या साध्या, मनमिळाऊ वागण्याने त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं.

प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी जी अहोरात्र मेहनत घेतली, त्याचे फळ आता मिळणार, असे वाटत असतानाच नियतीने एक असा आघात केला, की काळजाचा ठोका चुकला.

केवळ एका तांत्रिक चुकीमुळे प्रारूप मतदार यादीतून पवार कुटुंबियांचे नावच वगळले गेले… जणूकाही, चार वर्षे तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपेलेल्या स्वप्नावर एका क्षणात आभाळ कोसळले!

नाव वगळल्याची वार्ता समजताच देवदर्शनासाठी गेलेले हे दांपत्य तातडीने माघारी परतले. त्यावेळी पूजा वहिनींच्या डोळ्यांतील अश्रूच त्यांच्या मनातील वादळ आणि शब्दातीत वेदना व्यक्त करत होते. ‘आता सर्व मार्ग खुंटले,’ अशी हताश परिस्थिती!

पत्नीच्या डोळ्यांतील ते विरघळणारे अश्रू दीपक पवार यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्याच क्षणी त्यांनी मनाशी चंग बांधला—याही परिस्थितीत लढायचे, मार्ग काढायचा आणि सत्याला न्याय मिळवून द्यायचा!

दीपक पवार हे पत्नीच्या पाठीशी खंबीर हिमालयासारखे उभे राहिले. त्यांना पालकमंत्री ना. उदय सामंत आणि त्यांच्या मित्रपरिवाराची भक्कम साथ मिळाली. ही साथ म्हणजे अंधारात मिळालेला प्रकाशाचा किरण ठरली.

अखेरीस, न्यायदेवतेच्या दारात सत्याचा आणि तळमळीचा विजय झाला! न्यायालयाच्या आदेशाने पूजा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव पुन्हा एकदा मतदार यादीत सन्मानाने आले. दीपक पवार यांच्या मेहनतीला आणि पत्नीवरील विश्वासाला यश मिळाले!

अनेक दिवसांच्या संघर्षातून बाहेर पडल्यावर पूजा वहिनींच्या चेहऱ्यावर उमटलेले ते स्मित केवळ एक हास्य नव्हते, तर ते होते—संघर्षानंतर मिळालेल्या समाधानाचे, निष्ठा आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक!

सेवाव्रती दांपत्याच्या संघर्षाची ही कहाणी रत्नागिरीकरांसाठी एक प्रेरणा आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button