रत्नागिरी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी साक्षरता कार्यक्रम

रत्नागिरी, दि. १८ :- ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७ या कार्यक्रमाअंतर्गत तरतुदींची माहिती ज्येष्ठ नागरिकांना मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी साक्षरता कार्यक्रम जिल्हा न्यायालय सभागृहात पार पाडला. सचिव आर. आर. पाटील यांनी नालसा स्कीम फॉर सिनियर सिटिझन २०१६ ची माहिती दिली.
उपमुख्य लोकअभिरक्षक उन्मेश मुळये यांनी या कायद्याची आणि सहाय्यक लोकअभिरक्षक आयुधा देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता असणा-या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.




