रत्नागिरी

बळीराजा सेनेचे संगमेश्वर तालुका प्रमुख लोकम यांचा राजीनामा

देवरूख दि. ४ :- संगमेश्वर तालुका बळीराजा सेनेचे धडाडीचे तालुकाध्यक्ष नितीन लोकम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे

लोकम यांनी बळीराजा सेनेचे अध्यक्ष व सरचिटणीस यांना दिलेल्या राजिनामा पत्रात आपण वैयक्तिक कारणांमुळे पद व सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे नमुद केले असले तरी संघटनेतील कुरघोडीच्या राजकारणामुळे समाजाच्या विकासात व उन्नतीसाठी प्रयत्न होत नसलेने संघटन करताना अडचणीचे ठरत असून काही जण आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्यानेच कंटाळून राजिनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तोंडावर बळिराजा सेनेतील तालुक्यातील अनेक जण राजिनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत बळीराजा सेनेच्या काही पदाधिकारींकडे संपर्क साधला असता त्यांनी यावर भाष्य न करता संघटनेत वाद नसल्याचे सांगितले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button