
रत्नागिरी दि. २८ :- पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हापुसा गोवा येथे वर्ल्ड फूनाकोशि शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन मार्फत गोवा ओपन इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये केनिया, साऊथ आफ्रिका, नेपाळ, तसेच भारतातील वेगवेगळ्या राज्यातून सुमारे ८०० कराटे स्पर्धकांनी सहभाग केला, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एम एम ए फिटनेस सेंटर च्या १६ कराटेपटूंनी फुनाकोशी कराटे ऑर्गनायझेशनचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख कराटे प्रशिक्षक श्री.जावेद मिरकर तिसरी डिग्री ब्लॅकबेल्ट व सहाय्यक प्रशिक्षक नौशीन कापडी व अयान मिरकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.
या रत्नागिरी संघाच्या १६ कराटेपटूंनी पदके मिळवून दैदीप्यमान कामगिरी करत रत्नागिरी जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर शान वाढविली.
या स्पर्धेमध्ये विजेता मुली खालील प्रमाणे.( 5 वर्षे मुली) जैनब फकीर – काता मध्ये (रोप्य पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 6 वर्षे मुली मेहविश फकीर – काता मध्ये (सुवर्ण पदक ) फाईट मध्ये (रोप्य पदक ), युविका पिलणकर – काता मध्ये (कांस्यपदक ) फाईट मध्ये (सुवर्ण पदक ), 6 वर्षे मुली सिमराह मजगावकर – काता मध्ये (कांस्य पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 12 वर्षे मुली जोया बुडये – काता मध्ये (कांस्य पदक ), 13 वर्षे मुली फातिमा बुडये – काता मध्ये (कांस्य पदक ), आयेशा मजगावकर- काता मध्ये (रौप्य पदक ) फाईट मध्ये (रौप्य पदक ).
तसेच मुलांमध्ये पाच वर्षे ईझान कापडे – काता मध्ये (रौप्य पदक ), 6 वर्षे मुले सलमान मजगावकर – काता मध्ये (सुवर्ण पदक ) फाईट मध्ये (सुवर्ण पदक ), 7 वर्षे मुले अमीन काझी – काता मध्ये (सुवर्ण पदक) फाईट मध्ये (सुवर्ण पदक)
देव सरदेसाई – काता मध्ये (रौप्य पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 10 वर्षे मुले अब्दुल मुबदी धामस्कर – काता मध्ये (रोप्या पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 11 वर्षे मुले झीयान अहमद शेख- काता मध्ये (कांस्य पदक ) फाईट मध्ये (रोप्य पदक ) रेहान मजगावकर- काता मध्ये (सुवर्ण पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 13 वर्षे मुले उजैर मस्तान- काता मध्ये (कांस्य पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक ), 14 वर्षे मुले, जैद बुडये- काता मध्ये (रौप्य पदक ) फाईट मध्ये (कांस्य पदक )
या 16 कराटेपटूंनी दोन प्रकारांमध्ये खेळून तब्बल 29 पदके प्राप्त केली.
या यशस्वी खेळाडूंचे व त्यांचे प्रशिक्षक नौशीन कापडी व अयान मिरकर यांचे प्रमुख प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर यांनी खेळाडूंच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केला. तसेच विजेता खेळाडू व प्रशिक्षक यांच्यावर जिल्हाभरातील नागरिकांकडून अभिनंदनाचे वर्षा होत आहे.



