रत्नागिरी

दिवाळीपूर्वी धान्य दुकानदारांना विक्री कमिशन द्यावे; जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांची मागणी

चिपळूण दि. २१ :- दिवाळीपूर्वी धान्य दुकानदारांना जून 2025 पासून प्रलंबित असलेले विक्री कमिशन द्यावे अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली.

जिल्हाधिकारी जिंदल यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम, उपाध्यक्ष विजय राऊत, खजिनदार रमेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेतर्फे प्रलंबित विक्री कमिशन मिळावे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली. श्री. कदम यांनी धान्य दुकानदारांचे प्रश्न व इतर समस्या मांडल्या. आपण या सोडविण्याचा प्रयत्न करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button