रत्नागिरी

करबुडे मुळगाव येथे वीज पडून तेरा वर्षीय मुलगी जखमी तर धनवडे वाडीत बैलही झाले जखमी

रत्नागिरी दि. १५ :- विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने रत्नागिरी शहर आणि परिसराला झोडपून काढले आहे. तालुक्यातील काही भागात वीज कोसळण्याचा घटना घडल्या. या दुर्घटनेत करबुडे मुळगाव येथे सुनील तांबे यांच्या १३ वर्षे मुलीच्या अंगावर वीज पडल्याने ती जखमी झाली.

तसेच करबुडे धनवडेवाडी येथे राहणारे रमेश देना धनावडे यांचे बैल देखील वीज पडल्याने जखमी झाले. परतीच्या पावसाने अचानक लावलेल्या हजेरीने नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे दिवाळी खरेदीवरही परिणाम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button