रत्नागिरी

रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत एकाच वेळी लावला दोन बेपत्ता इसमांचा शोध

रत्नागिरी दि. २९ :- रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत एकाच वेळी दोन बेपत्ता इसमांचा शोध लावला आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून हरवलेले व बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी “मिशन शोध” सुरु करण्यात आलेले आहे.

“मिशन शोध” च्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे रत्नागिरी पोलीसांनी “मिशन शोध” अंतर्गत एकाच वेळी लावला दोन बेपत्ता इसमांचा शोधमार्फत जिल्ह्यातील हरविलेल्या व बेपत्ता इसमांचा विशेष शोध घेण्यात येत आहे.

संगमेश्वर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नंबर 11/2018 मधील नापत्ता सौ. माधुरी मंगेश तांबे वय 33 वर्षे रा. माखजन, बनेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ह्या सन 2018 साला पासून नापत्ता असल्याचे प्रकरण तसेच संगमेश्वर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नंबर 17/2022 मधील नापत्ता श्री. योगेश भालचंद्र तांबे वय 45 रा. माखजन, बनेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ही दोन्ही प्रकरणे निष्क्रिय (Dormant) फाइल मंजूरी करिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झालेली होती.

या दोन्ही प्रकरणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथका मार्फत “मिशन शोध” अंतर्गत माहिती घेण्यात आली व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेण्यात येत होता.

दिनांक 28/09/2025 रोजी या पथका मार्फत दोन्ही नापत्ता इसमांचा मुंबई येथे अधिक शोध घेतला असता दोन्ही व्यक्ति हे आपले नाव-गांव व मोबाइल नंबर बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही नापत्ता व्यक्तींना नालासोपारा ईस्ट येथून ताब्यात घेण्यात आले व दोन्ही व्यक्ति हे आपल्या गावी पुनः येण्यास तयार नसल्याने त्यांना तुळींझ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे तसेच पो.उ.नि. प्रशांत बोरकर, पो. हवा/1238 प्रवीण खांबे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी साहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button