रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल विठ्ठल जोशी यांचे दुःखद निधन

रत्नागिरी दि. २९ :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ. अनिल विठ्ठल जोशी यांचे शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले आहे.
त्यांनी गेली १० वर्षे जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. मनमिळावू स्वभाव, सर्वांना सांभाळून घेणे, बँकेच्या विविध विषयांमध्ये सक्रीय भाग घेणे, गोरगरिबांना नेहमी मदत करणारे तसेच व्यावसायिक बागाईतदार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांचे निधनामुळे गुहागर तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तसेच बँक अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.


