क्रीडारत्नागिरी

चिपळूण येथे ‘नमो युवा रन’ जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद: स्पर्धेत ९०० हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

चिपळूण दि. २९ :– पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित भाजपने रविवारी नशामुक्तीच्या प्रचार, प्रसारासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल ९५० स्पर्धक धावले. यात सिध्देश बर्जे, खुशी हसे, शुभम शितप, इच्छा राजभर हे विविध गटातील प्रथम क्रमाकांचे मानकरी ठरले

रविवारी सकाळी शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी ७ वाजता या स्पर्धेचे मान्यवरांच्याहस्ते फुगे सोडून तसेच झेंडा दाखवून उद्द्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धकांनी धावण्यास सुरुवात केली. या स्पर्धेच्या १४ ते १८ वर्षे विद्यार्थी ३ किलोमीटरच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र-चिंचनाका बाजारपेठ-बाजारपूल येवून पुन्हा त्याच मार्गे केंद्र या गटात शुभम शितप, पृथ्वी राजभर, रोहित राठोड, अथर्व दवंडे, आयुष बर्जे, सुजल घाणेकर, विपुल साळवी, विराज निवाते, विद्यार्थिनी गटात इच्छा राजभर, उमेरा सय्यद, सानिका डिके, अनुष्का खेराडे, साजिरी पावसकर, मृणाली खैराडे, श्रेया बने, वैभवी सोलकर, वैभवी डगळे यांनी अनुक्रमे पहिले ८ क्रमांक पटकावले. यातील पहिल्या तीन क्रमांकाना ५ हजार रुपये, ४ हजार, ३ हजार रुपये पदक व सन्मानचिन्ह व पुढील क्रमांकाना २ हजार, १ हजार, ५००, ३००, २०० रुपये व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

१८ पासून पुढील खुल्या ५ किलोमीटरच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र-चिंचनाका बाजारपेठ-बाजारपूल-गोवळकोट येथून पुन्हा त्याच मार्गे केंद्र या महिला गटात खुशी हसे, प्रमिला पाटील, तन्वी मल्हार, कोमल मोहिते, श्रृतिका वरक, पुरुष गटात सिध्देश बर्जे, सुरज कदम, ऑकार बैकर, यश शिर्के, स्वराज जोशी यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले. या दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना १० हजार रुपये, ७,५०० रुपये, ५ हजार रुपये पदक व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास २,५००, पाचव्या क्रमांकास एक हजार रुपये व पदक तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना पदक व टी शर्ट देऊन गौरवण्यात आले.

यावेळी भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे नेते प्रशांत यादव, युवा मोचचि प्रदेश सचिव विक्रम जैन, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, आयर्नमैन डॉ तेजानंद गणपत्ये, स्पर्धेच्या ब्रेड अँबेसिडर डॉ मनीषा वाघमारे, आंतरराष्ट्रीय धावपट संध्या दाभोळकर, जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, नीलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, उदय घाग, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, मोदी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष रुपेश कदम, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश शिर्के, अन्दर जबले, युवा मोर्चा सरचिटणीस मंदार कदम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश तटकरे, स्वप्निल सुर्वे, प्रथमेश धामणस्कर, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली निमकर, शहराध्यक्ष रसिका देवळेकर, रत्नदीप देवळेकर, मंगेश रांगळे, अनिल सावर्डेकर, संदीप भिसे, प्रांजल कचरेकर, शीतल रानडे, खेर्डीच्या माजी सरपंच सुगंधा माळी, डॉ स्वामिनी यादव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button