पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
वाणिज्य ९७:५६ टक्के; कला ४४:४४ टक्के

संगमेश्वर दि. २ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल९७:६५ तर कला शाखेचा निकाल ४४:४४ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केले आहे.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक वेदा शैलेंद्र चिचकर ८०:१७ टक्के , द्वितीय क्रमांक ऋतिका रामदास चव्हाण ६४:८३ टक्के , तृतीय क्रमांक दीक्षा दशरथ घेवडे ६४:२३ टक्के , चतुर्थ क्रमांक दीक्षा दत्ताराम डिके ६२ टक्के , पाचवा क्रमांक इशा हंसराज शिंदे ६१:८३ टक्के , वाणिज्य शाखा – प्रथम क्रमांक श्रुतिका शिवाजी सावंत ८३:३३ टक्के, द्वितीय क्रमांक दीक्षा अशोक कदम ७४:८३ टक्के, तृतीय क्रमांक वेदिका महेश चरकरी ७२:५० टक्के, चतुर्थ क्रमांक सानिका दत्ताराम कळंबटे ६९:८३, पाचवा क्रमांक श्वेता महेश जाधव ६९:३३ टक्के.
कला शाखा प्रथम क्रमांक संकेत संजय गुरव ५१ टक्के, द्वितीय क्रमांक पूजा विजय जाधव ३९:६७, तृतीय क्रमांक सौरभ विठोबा गुरव ३९:५०, चतुर्थ क्रमांक रिया मुकेश पवार ३८:६७ व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर येथे सर्व वर्गात नवीन प्रवेश देण्याचे काम दररोज सुरू असून पालक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी केले आहे.


