रत्नागिरीत आजपासून श्री दुर्गामाता दौडला प्रारंभ

रत्नागिरी दि. २२ : येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने आज श्री दुर्गामाता दौडला शहरातील मारूती मंदिर येथे संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व ध्वजाला पुष्पहार घालून प्रारंभ झाला आजची दौड मारूती मंदिर, माळनाका, श्री व्याघ्रेश्वरी अंबा माता मंदीर, के.सी जैन नगर , एकता मार्ग, मारुती मंदीर या मार्गे घेण्यात आली. आजपासून सुरु झालेली श्री. दुर्गा माता दौड विजयादशमी ( दसरा) पर्यत शहराच्या विविध भागात मार्गक्रमण करणार आहे.
२२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मारूती मंदिर सर्कल, शिवतीर्थ एकत्र येण्याचे ठिकाण आहे. सकाळी ५.४५ वाजता एकत्र यावे.मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, मजगांव रोड, चर्मालय क्रांतीनगर, कोकणनगर, चर्मालय, मारूती मंदिर हा मार्ग आहे महापुरूष मित्र मंडळ / क्रांतीनगर नवरात्र उत्सव मंडळ या मंडळाला भेट देण्यात येणार आहे. बुधवार दि २४ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, माळनाका, मेंटल हॉस्पिटल रोड- जेलरोड, माळनाका, मारूती मंदिर हा मार्ग आहे महापुरूष बाल मित्रमंडळ, पोलिस महापुरूष तरूण मित्रमंडळ या मंडळांना भेटी देण्यात येणार आहे. गुरूवार दि २५ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, दामले शाळा रोड, पॉवर हाऊस विश्वनगर, पॉलिटेक्निकल रोड, मारूती मंदिर विश्वनगर मित्रमंडळाला भेट देण्यात येणार आहे. शुक्रवार दि.२६ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, माळनाका सन्मित्रनगर, तारांगण रोड, माळनाका मारूती मंदिर हा मार्ग आहे. आई माऊली मित्रमंडळाला भेट देण्यात येणार आहे. शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, माळनाका, हिंदु कॉलनी रोड, थिबा पॅलेस रोड, हिंदू कॉलनी रोड, मारूती मंदिर थिबा पॅलेस रोड मित्र मंडळाला भेट देण्यात येणार आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी मारूती मंदिर, अभ्युदयनगर, नाचणे रोड, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारूती मंदिर असा मार्ग आहे. श्री नवलाई देवी मंदिराला भेट दिली जाणार आहे.
सोमवार दि. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत तेली आळी नाका, पाराजवळ (श्री महालक्ष्मी देवी) येथे एकत्र यायचे आहे. २९ सप्टेंबर रोजी तेली आळी नाका, पऱ्याची आळी, विठ्ठल मंदिर टिळक आळी, गणपती मंदिर जोगेश्वरी मंदिर, झाडगाव नाका, श्री देव भैरी सहान शेरेनाका, लक्ष्मी चौक, मारूती आळी, तेली आळी नाका हा मार्ग आहे. श्री जोगेश्वरी मंदिराला भेट दिली जाणार आहे.
मंगळवार ३० सप्टेंबर रोजी तेली आळी नाका, मांडवी नाका घुडेवठार, दत्त मंदिर, तेली आळी नाका हा मार्ग आहे. जय भैरव नवरात्र मंडळ / तेली आळी मंडळ भेट दिली जाणार आहे. १ ऑक्टोबर रोजी तेली आळी नाका, राम आळी, तांबट आळी, लक्ष्मी चौक, मारूती आळी तेली आळी नाका हा मार्ग आहे राधाकृष्ण मंदिर , नवलाई मंदिर भेट दिली जाणार आहे.
२ ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी मारूती मंदिर सर्कल, शिवतीर्थ येथे एकत्र यायचे आहे. मारूती मंदिर (दुचाकी वरून) मांडवी रोड, किल्ला, (दौड मार्ग) भगवती मंदिर हा मार्ग आहे श्री भगवती देवी मंदिर (किल्ले रत्नदुर्ग) येथे दुर्गा माता दौड जाणार आहे आणि या दौडची सांगता होणार आहे.
घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत सुरू असणाऱ्या या श्री दुर्गामाता दौड या उपक्रमात सर्व हिंदुनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे तसेच दौड मार्गातील माता भगिनींनी औक्षण करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी तर्फे करण्यात आले. अधिक माहितीसाठी जयदिप साळवी (9922429577), वैभव पांचाळ( 9673944816) यांच्याशी संपर्क साधावा.



