साखरपा देवरुख मार्गांवर सुप्रसिद्ध केतकर ज्वेलर्स च्या मालकांचे अपहरण आणि लूट!
तपास वेगाने सुरु!

देवरूख (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) हे काल रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास मित्राकडून साखरप्यातून देवरुखमधील घरी येत असताना या मार्गांवरील बावनदीचे दरम्यान पासून काही अंतरावर अज्ञातानी त्यांचे अपहरण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून लंपास करून त्यांना मारहाण करून वाटूळच्या रस्त्यावर उतरून पोबारा केला .या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत हातीआलेल्या माहिती नुसार धनंजय (तात्या) केतकर हे काल रात्री साखरपा येथून मित्राकडील घरगुती कार्यक्रम आटपून देवरुख येथे परत असताना बावनदीपासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तींनी गाडीची पाठलाग करून त्यांच्या गाडीला टक्कर देत गाडी घासून थांबवून त्यांचेकडे गाडीची नुकसान भरपाईच्या बहाण्याने त्यांना गाडीतून उतरवून बघा असे दरडावलेवर ते आपल्या गाडीतून गडबडीत उतरताच त्यांच्या अंगावर बुरखा टाकून त्यांना जबरदस्तीने हल्लेखोरांनी आपल्या गाडीत कोंबले व त्यांचे अपहरण पोबारा केला.
दरम्यान आपले बाबा अजून घरी आले नसल्याने मुलगीने त्यांचे साखरपा येथील मित्र बापू शेट्ये यांना फोनवर विचारले असता येथून निघाले आहेथ. १०मिनिटातच घरी येतील असे सांगितले. परंतु ते वेळ झाली तरी न आल्याने तीन परत बापुंना फोन केला येताना वाटेत काही घडले नाही ना? या शंकेने ती देवरूखातून साखरप्यात व बापू शेट्ये हे साखरप्यातून देवरुख कडे निघाले. मुलगीला बावनदीचे दरम्यान तात्यांची गाडी बाजूला लावलेली आढळून आली. दरम्यान बापु शेट्ये ही तेथे आले. दोघांनी आसपास शोध घेतला पण ते दिसत नसलेने त्यांना फोनही केला असता फोन बंद लागत असलेने मुलगी घाबरून गेली. काही वेळाने फोन केला असता फोन उचलला गेला तेव्हा त्यांनी पाच लाख रुपये दिल्याशिवाय मला सोडले जाणार नाही असे सांगितले. यावर मार्लेश्वर फाटा येथे एक इसम येईल त्याकडे रक्कम सोपवा असे सांगितले. त्यानंतर माजी जि. प सदस्य बापू शेट्ये यांनी प्रसंगावधान दाखवत याबाबतची माहिती देवरूख मधील मित्रांना संपर्क करून दीली. त्यांना मार्लेश्वर फाट्याजवळ गोळा केले. परंतु सदर व्यक्ती पैसे नेणेकरीता पुढे न आल्याने शेट्ये व सहकारी यांनी देवरूख पोलीस स्थानकात धाव घेत माहीत दीली. व तपास सुरू झाला. दरम्यान केतकर ना फोन केला असता त्यांनी दाभोळे – वाटुळ मार्गावर मला सोडून दिले असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जातीने लक्ष घालून तपासाला वेगाने गती देत पथके रवाना केली असून अज्ञातांचा शोध सुरु केला आहे
याबाबत अज्ञात इसमांच्या विरुद्ध रजि.नं.104/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम गुन्हा 311,309 (4),310 (1),140 (2),127(2),115(2), 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हा अन्वेषण विभागासह उप विभागिय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांचे मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहकारी हे अधिक तपास करीत आहेत.
तात्या केतकर यांच्या अपहरणामुळे देवरूख व साखरपा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



