रत्नागिरी

वालावलकर रुग्णालय तर्फे मोफत लहान मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर

संगमेश्वर दि. ७ ( प्रतिनिधी ):- डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात डॉ. पारस कोठारी हे मुंबईतील एक अत्यंत प्रतिष्ठित वरिष्ठ बालरोग शल्यचिकित्सक आहेत. सायन रुग्णालय येथे डॉ. कोठारी हे बालरोग शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. कोकण वासियांसाठी वालावलकर रुग्णालय डेरवण येथे ता. १३ व १४ रोजी ते उपलब्ध राहणार आहेत.

लहान मुलांच्या पोटाच्या शस्त्रक्रिया, जन्मत: असलेल्या आजारावरील उपचार, नवजात बाळांच्या शस्त्रक्रिया आणि गुंतागुंतीच्या जन्मदोषांचे व्यवस्थापन (जन्मजात विकृती), हर्निया, अपेंडिक्स, गाठी व सूज काढण्याची शस्त्रक्रिया, लघवी त्रासावरील उपचार यासारख्या विविध शस्त्रक्रिया करण्यात डॉ. कोठारी हे पारंगत आहेत. तरी शस्त्रक्रिया शिबिराचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासना कडून करण्यात आले आहे. या नोंदणी साठी सचिन धुमाळ, संकेत जांभळे यांच्याकडे संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button