रत्नागिरीसामाजिक

“समाजासाठी अखेरचे दान : रत्नागिरीत १९ वे देहदान संपन्न”

रत्नागिरी दि. २८ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे देहदानाची प्रेरणादायी परंपरा पुढे नेत १९ वे मरणोत्तर देहदान संपन्न झाले. कै. प्रदीप तुकाराम कोलते (वय ७९ वर्षे, रा. तळवाडी, साखरपा, ता. संगमेश्वर) यांचे सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले.

कै. प्रदीप तुकाराम कोलते यांनी महात्मा गांधी विद्यालय साखरपा तसेच बाबासाहेब कोलते ज्युनिअर कॉलेज साखरपा येथे कमिटी सदस्य म्हणून कार्य केले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे व पुतणे असा मोठा परिवार आहे.

देहदानावेळी त्यांच्या दोन्ही मुली सीमा पाटणे, स्मिता लाड तसेच ओंकार कोलते, शेखर कोलते, अविनाश कोलते, कमलेश कोलते, विनय कोलते, कैलास कोलते आणि राहुल भिंगार्डे उपस्थित होते. सदर देहदानासाठी सागर भिंगारे यांचे सहकार्य लाभले.

सदर देहदान प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक श्री. रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी व प्रियल आडिवरेकर यांनी काम पाहिले.

देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोठी मदत होत असून, समाजात अशा प्रकारच्या दानाची प्रेरणा निर्माण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button