रत्नागिरी

विजया देव यांचे हृदयविकाराने निधन

रत्नागिरी दि. २२ : सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती विजया आत्माराम देव (वय ७३) यांचे १८ मार्च रोजी मध्यरात्री राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.

सेवानिवृत्तीनंतर वाचनालय तसंच अनेक ठिकाणी त्या सक्रीय होत्या. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असे. समाजातील गरजू लोकांना त्या नेहमीच मदतीचा हात देत असत. पत्रकारिता अभ्यासक्रम, त्याचप्रमाणे मोडी भाषेचे ज्ञान त्यांनी अतिशय आवडीने आणि मेहनतीने संपादन केलं होतं. सेवानिवृत्तीनंतर कोकण शिल्प या मासिकामध्ये त्या लेख लिहीत असत. परिसरामध्ये एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून त्या सुपरिचित होत्या. त्यांचा दशक्रिया विधी भाट्ये येथे दि. २७ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button