रत्नागिरी
रत्नागिरीत रमजान ईद उत्साहात साजरी

रत्नागिरी दि. २१ :- आज सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी शहरातही ईदचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
उद्यमनगर, जामा मशीद बाजारपेठ, कोकण ईदगाह तसेच राजनगर येथील प्रमुख मशिदींमध्ये पवित्र रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली. या प्रसंगी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. शहरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.



