रत्नागिरी

गुहागर येथील घरफोडी प्रकरणी ४ जण गजाआड

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कारवाई

रत्नागिरी दि. १२ :- गुहागर येथील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे मार्फत ४ जणांत ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ₹11.95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात घरफोडी, चोरी सारख्या यांसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले होते.

त्या अनुषंगाने गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठ येथील ओंकार ज्वेलर्स या दुकानात दिनांक 18/02/2026 रोजी पहाटे सुमारे 01.31 वा. अज्ञात इसमांनी दुकानाचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करून आतील शटर तोडण्याचा प्रयत्न केला होता.

या घटने प्रकरणी गुहागर पोलीस ठाणे येथे संशयित इसमांविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331 (6), 331 (4), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने सदर गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने तांत्रिक तपास, सी.सी.टी.व्हि फुटेज व गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपीत इसम 1) निशांत सुधीर आंबोकर रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर मुंबई 2) मोईन शकील शेख रा. गोपाल भवन, घाटाकोपर, मुंबई, 3) सुमित कुलदीप चुनियाना रा. कोहीनुर सीटी, कुर्ला, मुंबई व 4) आयुष जितेंद्र घागडा, रा. तानसा पाईपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई यांना पंतनगर घाटकोपर, मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य असा एकूण ₹11,95,200/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व श्रे.पो.उनि. श्री. संदीप ओगले, पो.हवा/909 विजय आंबेकर, पो.हवा/306 गणेश सावंत, पो.हवा/1407 दिपराज पाटील, पो.हवा/265 योगेश नार्वेकर व चा.पोशी/215 अतुल कांबळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button