जी. डी. सी. अँड ए. व सी. एच. एम. परीक्षेस अर्ज करण्यास १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी, दि. ११ :- शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि.26, 27 व 28 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 9 जानेवारी ते दि.10 मार्चपर्यंत होती. याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था च्या सहकार आयुक्त व निबंधक, यांच्या सूचनेनुसार जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षा 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://gdcs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि.15 मार्च रात्री 8 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने भरणा करण्याची मुदत दि.18 मार्च रोजी बँकेच्या कामकाजाच्या वेळेपर्यंत देण्यात आलेली आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा व आपले अर्ज दाखल करताना “ रत्नागिरी ” या केंद्राची नोंद घेवून अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी 821/अ, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सह. पतपेढी इमारत, पहिला मजला, कॅनरा बँके जवळ, के.एस.पी रेसीडेन्सी समोर, आरोग्य मंदिर, मजगांव रोड, रत्नागिरी पिन 415612 कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे, यांनी केले आहे.



