राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

मुंबई दि. १५ :- राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे –
१) मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दि. ०१/०७/२०२५
२) राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन दि.०१ जुलै, २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करणे – दि. १४/१०/२०२५
३) राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार केलेली प्रारुप मतदार यादी, हरकती व सूचना मागविण्याकरिता प्रसिध्द करण्याचा दि. ०६/११/२०२५
४) प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक १४/११/२०२५
५) प्रारुप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे – दि. २८/११/२०२५
६) मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिध्द करणे- दि. ०४/१२/२०२५
७) मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे – दि. १०/१२/२०२५



