रत्नागिरी

रत्नागिरी शहरात चार जणांकडे मिळाले ब्रााऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ

मिशन फिनिक्स अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथकाकडून ही कारवाई

रत्नागिरी दि. १२ :- रत्नागिरी शहरात पेट्रोलींग करत असताना सिव्हील हॉस्पीटल ते निवखोल बाजूकडे जाणारे रोडवर चार जणांकडे  ब्रााऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ मिळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

मिशन फिनिक्स अंतर्गत पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ जानेवारी रोजी 19.30 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक पोलीस स्टाफसह रत्नागिरी शहर परिसरामध्ये शासकीय वाहनाने पेट्रोलींग करत असताना सिव्हील हॉस्पीटल ते निवखोल बाजूकडे जाणारे रोडवर सिव्हील हॉस्पीटल कंम्पाऊचे 1) ताहीर रफीक कोतवडेकर रा. रुबी अपार्टमेंट, थिबा पॅलेस रोड रत्नागिरी 2) रिझवान अश्रफ नावडे , रा.राजीवडा रत्नागिरी, 3) आकीब जिक्रीया वस्ता रा. राजीवडा मच्छी मार्केट जवळ रत्नागिरी 4) रफत करीम फणसोपकर रा. जुने मच्छीमार्केट राजीवडा रत्नागिरी यांचे ताब्यात 30 ग्रॅम वजनाचा ब्रााऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून ब्रााऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ व इतर साहीत्य असा एकूण 3,61,200/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीत व मुद्देमाल रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी पो.नि. नितीन ढेरे , श्रेणी पोउनि श्री. संदीप ओगले, पोहवा.251 शांताराम झोरे, पोहवा. 909 विजय आंबेकर, पोहवा. 1407 दिपराज पाटील, पोहवा. 262 विवेक रसाळ, पोहवा. 265 योगेश नार्वेकर, पोकॉ. 215 अतुल कांबळे या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button