लायनेस्टीक वर्ष २५-२६ चे लायन्स सेवा पुरस्कार जाहीर

रत्नागिरी दि. २० :- लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे प्रतिवर्षी समाजामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्काराने करण्यात येतो. हे पुरस्कार जेष्ठ लायन सदस्य आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष एम जे एफ ला डॉ संतोष बेडेकर यांचे आई वडिलांचे स्मृती प्रित्यर्थ देण्यात येतात. यंदा हे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे.पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व रोख पारितोषिक असे आहे.
लायनेस्टिक वर्ष २०२५-२०२६ सालाकरीता लायन्स सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्ती –
१. श्री सदानंद मधुकर भागवत
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य
२. श्री गौरांग अनंत आगाशे
अनबॉक्स या स्टार्टअप मधून रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक कचरा संकलन
३. श्री संदीप जयसिंग तावडे
ॲथलेटिक्स(खो खो) या क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय काम
४. श्रीमती वीणा शिरीष लेले
वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती आणि संचालन
५. सौ शमीन शाश्वत शेरे
दिव्यांग मुलांसाठी सातत्यपूर्ण कार्य
या व्यक्तींचा गौरव शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी मा प्रांतपाल एम जे एफ ला. डॉ विरेंद्र चिखले यांचे हस्ते प्रांतपालांच्या अधिकृत भेटी दरम्यान करण्यात येणार आहे.सर्व थरांतून लायन्स सेवा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कौतुक होत आहे.



