रत्नागिरी

रत्नागिरीचे प्रसिद्ध ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ. प्रसन्न मुळ्ये “महर्षी अत्रि वास्तुशिल्पी” पुरस्काराने सन्मानित!

रत्नागिरी दि. २८ :- “श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी” चे संस्थापक अध्यक्ष आणि “ब्रह्मचैतन्य ज्योतिष ज्ञानपीठाचे कुलपती”, ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि वास्तु तज्ञ ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी छ. संभाजीनगर येथे ज्येष्ठ वास्तुतज्ञ कै. यशवंत मग्गीरवार यांचे स्मृती प्रित्यर्थ “श्री अत्रेय-ज्योतिष-वास्तू आध्यात्मिक संस्था”, छ. संभाजीनगर व गुरुश्री प्रिया मालवणकर यांचेतर्फे आयोजित वास्तु अधिवेशनात “महर्षी अत्रि वास्तुशिल्पी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना “महर्षी अत्रि वास्तुशिल्पी” पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button