रत्नागिरीराजकीय

राजेंद्र महाडिक यांची रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी तरविलास चाळके, संजय साळवी जिल्हा शिवसेना संघटकपदी निवड

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहीर केले रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक

रत्नागिरी दि. १५ :- शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक जाहीर केले आहेत.

त्यानुसार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांची रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्हा शिवसेना संघटक पदी राजापूर, लांजा, संगमेश्वर करिता विलास चाळके यांची निवड करण्यात आली आहे

रत्नागिरी, चिपळूण तालुक्यासाठी जिल्हा शिवसेना संघटक पदी संजय साळवी यांची तर गुहागर, खेड, मंडणगड, दापोली तालुक्यासाठी महेश नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button