रत्नागिरी

प्रथमेश गावणकर हे कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व : किशोर पवार

विल्ये दि. १५ (अमित कांबळे) :-  सर्वसामान्य नागरिक व कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे लढणारे अष्टपैलू नेतृत्व खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांचा विशेष सत्कार कळझोंडी धरण जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कंत्राटी कामगारांच्या वतीने करण्यात आला.

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद कळझोंडी धरण जयगड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे विनंती शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती.वर्षेभराच्या कालावधीत खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व युवक लढवय्ये नेते प्रथमेश गावणकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन ही करण्यात आले होते.या लढ्याला यश येऊन कळझोंडी धरण कंत्राटी कामगारांचे मानधनात वाढ झाली असून या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करताना या ऐतिहासिक आंदोलनाचे प्रणेते युवक नेते प्रथमेश गावणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

गावणकर यांनी जयगड पंचक्रोशी, खंडाळा परिसर व रत्नागिरी शहरातही लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मोठमोठी यशस्वी आंदोलने केली आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील एक नवीन युवा नेतृत्व प्रथमेश गावणकर यांच्या रूपाने खंडाळा पंचक्रोशीत उदयास येत असल्याने परिसरातील तमाम नागरिक व युवकांनी संघटन कौशल्य बांधून त्यांच्या लोकहीतवादी चळवळीला जाहीर पाठिंबा दिला आहे.

प्रथमेश गावणकर यांच्या उचित कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button