चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळा आदर्श शाळा पुरस्काराने सन्मान

रत्नागिरी दि. १४ जुलै :- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मांडकी खुर्द शाळेला सन २०२४-२५ चा जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते सन्मान पुरस्कार देण्यात आला.
ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातील एक आदर्श शाळा आहे. जिल्ह्यातील पहिली इंटरॲक्टिव्ह डिजीटल शाळा आहे.या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा १ मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.डेरवण युथ गेम्स मध्ये शाळा दरवर्षी सहभागी होते.राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेत सलग 10 वर्षे विजेतेपद या शाळेने पटकावले आहे. या शाळेने तब्बल १२ लाखांचा शैक्षणिक उठाव केला आहे.
शाळेच्या प्रगतीत शाळा व्यवस्थापन समिती मांडकी खुर्द अध्यक्ष श्री.निलेश डिके, श्रीराम घाणेकर,संजय मादगे,सोनू मादगे, संजय धुमक, सचिन खांबे, संतोष गुडेकर,तानाजी गुडेकर,प्रकाश घाणेकर, सुभाष डिके,सोनू धुमक, नितीन मादगे व सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका मीना विचारे, पदवीधर शिक्षक दत्तात्रय नार्वेकर, उपशिक्षिका विद्या कसबेकर, उपशिक्षक रविंद्र घाणेकर यांचे मोठे योगदान आहे.
त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख श्री विजय कवितके सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सशाली मोहिते शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राज अहमद देसाई साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. इरनक यांची प्रेरणा लाभली.


